लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये साखर कारखान्यांचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आहे. राज्यातील साखर कारखान्यांनी गत हंगामाच्या तुलनेत यंदा कमी साखर उत्पादन मिळवले आहे.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने दिलेल्या माहितीनुसार २०२१-२२ हंगामात २८ फेब्रुवारी २०२२ पर्यंत यूपीत ११२ कारखाने सुरू आहेत. तर ८ कारखान्यांचे कामकाज बंद झाले आहे. हे कारखाने पूर्व विभागातील आहेत. या कारखान्यांनी २८ फेब्रुवारी २०२२ अखेर ६८.६४ लाख टन साखर उत्पादन घेतले आहे. तर २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत या कारखान्यांनी ७४.२० लाख टन साखर उत्पादन घेतले होते. गेल्या वर्षी या काळात ११ कारखाने बंद पडले होते.
साखर उत्पादन ३३३ लाख टन होण्याची शक्यता
इस्माने आपल्या दुसऱ्या ॲडव्हान्स अंदाजात ११७ लाख टनाच्या तुलनेत महाराष्ट्रात २०२१-२२ हंगामात १२६ लाख टन (इथेनॉलमध्ये रुपांतरानंतर) साखर उत्पादनाचे अनुमान जाहीर केले आहे. अशाच पद्धतीने कर्नाटकमध्ये ५५ लाख टन साखर (इथेनॉल रुपांतरानंतर) उत्पादन होईल. मात्र, युपीसह इतर राज्यांत फारसा बदल होण्याची अपेक्षा नाही. या राज्यांत १५२ लाख टन साखर उत्पादन होईल. अशा प्रकारे २०२१-२२ या हंगामात देशात ३३३ लाख टन साखर उत्पादनाची अपेक्षा आहे. तर ३४ लाख टन साखर इथेनॉल उत्पादनाकडे वळवली जाईल.