यावर्षी खरीप पीकांचे लागवड क्षेत्र 59 लाख हेक्टरपेक्षा अधिक वाढले आहे. केंद्रीय कृषी तसेच कल्याण मंत्रालयाच्या अहवालानुसार, गेल्या वर्षात याच अवधीमध्ये 1045.18 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावेळी 1104.54 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये लागवडीसह रेकार्ड प्रगतीची नोंद झाली आहे.
जर ऊसाबाबत बोलायचे झाल्यास, गेल्या वर्षाच्या 51.75 लाख हेक्टर क्षेत्राच्या तुलनेत यावेळी 52.46 लाख हेक्टर क्षेत्रामध्ये ऊसाची लागवड झाली आहे. अर्थात लागवड क्षेत्रामध्ये 1.37 टक्के वाढ झाली आहे. लागवडीचे शेवटचे आकडे खरीफ हंगामासाठी 1 ऑक्टोबर 2020 ला येण्याची शक्यता आहे.
कोरोनाचा परिणाम आतापर्यंत खरीफ पीकांअंतर्गत लागवड क्षेत्रातील वाढीवर झाला नाही. सरकार सतत शेतकर्यांच्या प्रगतीसाठी काम करत आहे आणि लॉकडाउन दरम्यानही हे सुनिश्चित करण्यात आले की, शेतकर्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येवू नयेत.
Audio Playerहि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.