सोलापूर : सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखान्याचा ऊस गळीत हंगाम १५ नोव्हेंबर रोजी सुरू झाला असून, दि. २८ नोव्हेंबरअखेर १ लाख २४ हजार ८६० मे. टन उसाचे गाळप करून कारखान्याने १ लाख ०६ हजार साखर पोत्याचे उत्पादन केले. कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी ही माहिती दिली. कारखान्यात उत्पादित झालेल्या १ लाख १ हजार १११ व्या साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. सध्या प्रती दिन ८५०० मे.टन याप्रमाणे उसाचे गाळप होत आहे.
कारखान्यातील साखर पोती पूजनास उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, संचालक लक्ष्मण शिंदे, सतीश शेंडगे, विजयकुमार पवार, रावसाहेब मगर, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, महादेव क्षिरसागर, गोविंद पवार, सुभाष कटके, जयदीप एकतपुरे, रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक, प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत-पाटील, संचालिका सुजाता शिंदे, कार्यलक्षी संचालक-रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व पांडुरंग एकतपुरे, बाळासाहेब माने-देशमुख, राजेंद्र भोसले, धनंजय सावंत उपस्थित होते. सध्या कारखान्याचा सरासरी साखर उतारा ९.३५ टक्के आणि आजचा साखर उतारा ९.४० टक्के आहे. कारखान्यातील सहवीज निर्मिती प्रकल्प ७ नोव्हेंबरपासून सुरू झाला असून, १ कोटी ०९ लाख ४५ हजार ०९० युनिट वीज निर्माण झाली आहे. डिस्टिलरीमध्ये १८ लाख ९४ हजार २१९ लिटर्स रेक्टिफाईड स्पिरीट, १६ लाख ७८ हजार ४५४ लिटर्स इथेनॉल उत्पादन झाल्याचे सांगण्यात आले.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.