सोलापूर : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणातून २२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतलेले आहेत, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत २१ संचालक मंडळाच्या जागेसाठी एकूण २७२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक रिंगणातून बागल व जगताप गटाने आपल्या उमेदवारांना निवडणुकीतून माघार घेण्याचे आवाहन केलेले आहे. त्यानुसार जगताप व बागल गटाच्या काही उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून आपली उमेदवारी मागे घेतलेली आहे. बुधवार दि. २ एप्रिल रोजी उमेदवारी त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेणाऱ्यामध्ये जेऊर ऊस उत्पादक गटातून महादेव गोविंद कामटे, अतुल लक्ष्मण गोडगे, लक्ष्मण मनोहर घोडके, उत्पादक गटातून महावीर भैरव तळेकर, अजिनाथ भगवान फरतडे, सालसे ऊस उत्पादक गटातून अंगद शामराव मोरे पाटील, देवराव बाबुराव सरडे, पोमलवाडी ऊस उत्पादक गटातून दत्तात्रय महाळू गायकवाड, निवृत्ती बाबुराव निकम, रणजित बिभीषण शिंदे, रावगाव ऊस उत्पादक गटातून नानासाहेब सोपान शिंदे, अजिनाथ ग्यानबा शिरगिरे, हरिश्चंद्र आनंदा झिंजाडे, महिला राखीव प्रतिनिधी गटातून मनीषा दिलीप ढेरे यांचा समावेश आहे.