सोलापूर : दैनिक लोकमतमधे प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, यंदाच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील सात साखर कारखान्यांचा अपवाद वगळता इतर कारखान्यानी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पैसे देण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, जिल्ह्यातील २६ साखर कारखान्यांनी ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ५३३ कोटी ८८ लाख रुपये थकवले आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १०० टक्के बिले दिलेल्या कारखान्यांमध्ये श्री पांडुरंग पांडुरंग श्रीपूर, सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील, विठ्ठलराव शिंदे, पिंपळनेर, करकंब, ओंकार शुगर, म्हैसगाव (जुना विठ्ठल कॉर्पोरेशन) ओंकार शुगर चांदापुरी, व्ही. पी. शुगर, तडवळ या साखर कारखान्यांचा समावेश आहे.
ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सर्वाधिक पैसे थकवणाऱ्या पाच साखर कारखान्यांमध्ये लोकमंगल भंडारकवठे कारखान्याने ५० कोटी रुपये, जय हिंद शुगरने ४८ कोटी २९ लाख रुपये, बबनराव शिंदे तुर्कपिंपरीने ४२ कोटी ३१ लाख रुपये, पंढरपूरच्या विठ्ठल सहकारी कारखान्याने ४० कोटी ६५ लाख रुपये, सिद्धनाथ शुगर तिर्हे कारखान्याने ३९ कोटी ६ लाख रुपये आणि संत दामाजी कारखान्याने ३३ कोटी ८१ लाख रुपये यांचा समावेश आहे.
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.