सोलापूर : इथेनॉल वाहतूक करणारे ३ टँकर आगीत भस्मसात

सोलापूर : जय हिंद शुगरच्या इथेनॉल वाहतूक करणाऱ्या तीन टँकरना अचानक आग लागली. येथील हॉटेल स्वराज्य समोरील पार्किंगच्या जागेत बुधवारी पहाटे हा प्रकार घडला. आग रोखण्याच्या प्रयत्नात तिन्ही टँकर चालक जखमी झाले. जखमींना यशोधरा हॉस्पिटल व सिव्हिल हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पहाटे साडेचार वाज लागलेली आग सकाळी उशिरापर्यंत अग्निशामक दलाचे कर्मचारी विझविण्याचे शर्तीचे प्रयत्न करीत होते. चिंचोली एमआयडीसीतील अग्निशामक दल तसेच सोलापूर महानगरपालिकेचे अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला.

पाकणी येथील इंडियन ऑइल कॉर्पोरेशन, भारत पेट्रोलियम कार्पोरेशन, हिंदुस्तान पेट्रोलियम कार्पोरेशन, या ऑईल पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना साखर कारखान्यांकडून हे इथेनॉल पुरवठा केले जाते. रात्री साखर कारखान्यावरून इथेनॉल घेऊन आलेले टँकर कंपनीमध्ये सकाळी खाली होत असल्याने ते पार्किंगमध्ये पार्क केले जातात. यातील टँकर क्रमांक एमएच ४३ वाय ८४३६, एमएच २१ एबी ७४४४, एमएच ४३ -८०३७ यांना आग लागली. अचानकपणे तिन्ही टँकरनी पेट घेतल्‍याने आगीचा मोठा भडका उडाला. घटनास्थळी तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली. उत्पादन शुल्कच्या अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. टँकरला आग कशामुळे लागली. या विषयी नागरिकांमध्ये उलट सुलट चर्चा ऐकायला मिळत होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here