सोलापूर : उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीसह इतर वाहनांच्या धडकेने अपघातात वाढ

सोलापूर :साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झाला आहे. गाळपासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची वर्दळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाढली असून उसाच्या ट्रॅक्टर ट्रॉलीला दुचाकीसह इतर वाहने धडकून अपघात होत आहेत. अनेकांना या घटनांत आपले प्राण गमवावे लागले आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी होणाऱ्या अपघातांचे प्रमाण जास्त आहे.

टेल लॅम्प सुरु ठेवणे, ट्रॅक्टरच्या बँक साईडला रेडियम रिफ्लेक्टर लावणे, ट्रॅक्टर रस्त्यात उभे करताना फ्लेक्सिबल पार्किंग बॅरियर वापरणे, ट्रॅक्टर ट्रॉलीतून क्षमतेपेक्षा अधिक ऊस वाहतूक न करणे, उसाच्या मोळ्या खाली लोंबकळू न देणे, ऊस वाहतुकीच्या ट्रॅक्टरमध्ये बसविलेल्या साऊंड बॉक्सवर जोरजोरात गाणी न वाजवणे आदी नियमांचे पालन होत नसल्याने अपघात होत आहेत. ऊस वाहतुकीची वाहने चहा-पानसाठी किंवा दुरुस्तीसाठी रस्त्यावर उभी केल्यानेही रात्रीच्यावेळी अपघात घडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here