सोलापूर : श्री आजिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटच्या दिवशी २७२ पैकी २०४ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले आहे. आता २१ जागेसाठी ६२ उमेदवार उमेदवारी रिंगणात राहिले आहेत. ही निवडणूक तिरंगी होत आहे. आमदार नारायण पाटील, माजी संजयमामा शिंदे, प्रा. रामदास झोळ हे निवडणूक लढवत आहेत. या निवडणुकीतून माजी आमदार जयवंतराव जगताप गट व बागल गटाने माघारी घेतली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार जयवंतराव जगताप, आदिनाथचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे, बाजार समितीचे माजी सभापती शिवाजी बंडगर, माजी उपसभापती चिंतामणी जगताप यांच्यासह अनेक दिणव उमेदवारांनी आपण उमेदवारी अर्ज मागे घेतले.
गट-आघाडी निहाय उमेदवार असे…
आमदार नारायण पाटील गट (महाविकास आघाडी) –
जेऊर गट श्रीमंत चौधरी, महादेव पोरे, दलाय गव्हाणे. सालसे गट : रविकिरण फुके, दशरथ हजारे, आबासाहेब अंबारे, पोमलवाडी गट : किरण कवडे, नवनाथ इसेज, संतोष खाटमोडे पाटील केम गट दत्तात्रय देशमुख, विजयसिंह नवले, महेद्र पाटील. रावगाव गट देवानंद बागल, अॅड. राहुल सावंत, डॉ. अमोल पाडगे, उत्पादक सहकारी संस्था, विगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी डॉ. हरिदास केवार अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी राजाभाऊ कदम, महिल्य राखीव प्रतिनिधी : राधिका तळेकर व उर्मिता सरडे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी : दादासाहेब पाटील भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग आमदार नारायण पाटील
माजी आमदार संजयमामा शिंदे गट (महायुती) –
जेऊर गट: चंद्रकांत सरडे, प्रशांत पाटील व प्रमोद बंदे. सालसे गठ : विलास जगदाळे, नागनाथ चिवटे, नवनाथ जगदाळे, पोमलवाडी गट: दशरथ पाटील, बबन जाधव अॅड. नितीनराजे भोसले केम गट : संक्यमामा शिंदे, सोमनाथ देशमुख, सोमनाथ रोकडे. रावगाव गट : अभिजित जाधव-पाटील, आशिष गायकवाड, विनय ननको उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी सुजित बागत. अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी बाळकृष्ण सोनवणे, महिला राखीव प्रतिनिधी: मंदा सरडे व शातन गुंडगिरे, इतर मागासवर्ग प्रतिनिधी रोहिदास माळी. भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग अनिल केकाण,
प्रा. रामदास झोळ गटाचे उमेदवार –
जेऊर गट दत्तात्रय कामटे, शांतीलाल जाधव, रवींद्र गोडगे. सालसे गट अण्णासाहेब देवकर, दत्तात्रय जगदाळे, भारत साठे. पोमलवाडी गट प्रा. रामदास झोळ, भरत जगताप, प्रकाश गिरंजे. केम गट: सुधीर साळुखे, बापूराव तळेकर, रावगाव गड कल्याण पाटील, सुभाष शिंदे, हरिभाऊ झिंजाडे, उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था प्रतिनिधी दशरथ कांबळे, अनुचित जाती व अनुसूचित जमाती प्रतिनिधी: दशरथ कांकरे, महिला राखीव प्रतिनिधी: इंदुबाई नाईकनवरे व रत्नमाला मंगवडे. इतर मागासवर्ग प्रतिनिधी रवींद्र गोडगे, भटक्या विमुक्त जाती व जमाती विशेष मागास प्रवर्ग रामचंद्र खाडे.