सोलापूर : करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली आहे. १० मार्चपासून निवडणूक प्रक्रिया सुरू होत असून १७ एप्रिल रोजी मतदान तर १९ एप्रिल रोजी मतमोजणी व निकाल जाहीर होणार असल्याची माहिती तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी दिली. उपजिल्हाधिकारी अमोलसिंह भोसले हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. सहा मतदारसंघातून २१ संचालक निवडून दिले जाणार आहेत. जेऊर, सालसे, पोमलवाडी, केम, रावगाव अशा पाच ऊस उत्पादक सभासद गटांचा यात समावेश आहे.
साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी १० ते १७ मार्च सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत. १८ मार्च रोजी दाखल अर्जांची छाननी होणार आहे. १९ मार्च रोजी सकाळी ११ वाजता पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १९ मार्च ते २ एप्रिलपर्यंत सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ३ एप्रिल रोजी उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. याच दिवशी उमेदवारांना चिन्ह वाटप होईल. १७ एप्रिल रोजी सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत मतदान होणार असून मतमोजणी १९ एप्रिल रोजी होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
सोलापूर : श्री संतनाथ सहकारी साखर कारखान्याला भीषण आग
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.