सोलापूर : नंदूर (ता. मंगळवेढा) येथील आवताडे शुगर अँड डिस्टीलरीज, प्राथमिक आरोग्य केंद्र मरवडे व मंगळवेढा मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल मंगळवेढा यांच्या संयुक्त विद्यमाने ऊस तोडणी मजूर व कामगारांसाठी मोफत क्षयरोग व सर्व रोग तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात ३५५ ऊसतोडणी मजूर व कामगारांची रक्तदाब, रक्तातील साखर, ई.सी.जी, क्षयरोग, अस्थीरोग, बालरोग, स्त्रीरोग, रक्त तपासणी करून त्यावरील उपचार मोफत करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुर्मदास चटके, कारखान्याचे कार्यकारी संचालक मोहन पिसे, वैद्यकीय अधिकारी डॉ. दत्तात्रय शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. हंगाम कालावधीत आरोग्य विभागाच्या मदतीने ऊस तोडणी मजूर व कामगारांची आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना साखर आयुक्तांनी दिल्या आहेत. त्याअनुषंगाने समाधान आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर घेण्यात आले. शिबीरासाठी डॉ.डी.जी शिंदे डॉ. नंदकुमार शिंदे, डॉ. अरुणकुमार महिंद्रकर, डॉ. श्रेयश जाधव, डॉ. गौरीशंकर बुगडे, डॉ. महेश माळी, डॉ. सिद्राया बिराजदार, डॉ. आनंद हत्तरसंग, मोहन यादव, तुळसा सलगर, भारत निकम, सुहास शिनगारे, मोहन पवार, डी. बी. बळवंतराव, संभाजी फाळके, बजीरंग जाधव, राहुल नागणे, तोहीद शेख, दामोदर रेवे, निलेश रणदिवे, चंद्रकांत राठोड, रणजीत पवार आदीनी परिश्रम घेतले.