सोलापूर: मकाई कारखान्याची सत्ता राखण्यात बागल गटाला यश

सोलापूर : करमाळा तालुक्यातील मकाई सहकारी साखर कारखाना निवडणुकीत बागल गटाने एकतर्फी विजय मिळवत कारखान्यावरील आपली सत्ता कायम ठेवली. बागल गटाच्या आठ जागा अगोदरच बिनविरोध निवडून आल्या होत्या. उर्वरित नऊ जागांवरही विजय मिळवत विरोधकांचा पराभव केला. कारखान्याच्या १७ जागांसाठी ७५ उमेदवार रिंगणात होते. त्यापैकी विरोधी गटाचे केवळ सात अर्ज मंजूर झाले. त्यापैकी दोघांनी माघार घेतल्याने पाच उमेदवार रिंगणात होते. निवडणुकीत बागल गटाला प्रा. रामदास झोळ आणि मोहिते पाटील समर्थक सविताराजे भोसले यांनी आव्हान दिले होते. पण त्यांचे अर्ज छाननीतच बाद झाल्याने निवडणूक एकतर्फी होण्याचा अंदाज वर्तविला जात होता. विजयी उमेदवार असे, सतीश नीळ, दिनकर सरडे, सचिन पिसाळ, युवराज रोकडे, नवनाथ बागल, बापू चोरमले, आशिष गायकवाड, अनिल अनारसे, अजित झांजुर्णे, रामचंद्र हाके, रेवन्नाथ निकत, संतोष पाटील, बाळासाहेब पांढरे, दिनेश भांडवलकर, अमोल यादव, कोमल करगळ, अश्विनी झोळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here