सोलापूर : आगामी गाळप हंगामात भैरवनाथ शुगर करणार पाच लाख टन ऊस गाळप

सोलापूर:मंगळवेढा तालुक्यातील लवंगी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि., युनिट-३ या साखर कारखान्यामध्ये सन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी मिल रोलरचे पूजन व्हा. चेअरमन अनिल सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. यावेळी भैरवनाथ शुगरने या वर्षीच्या गळीत हंगामात पाच लाख मे. टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले असल्याची माहिती त्यांनी दिली. कारखान्याचे संस्थापक राज्याचे आरोग्यमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत व चेअरमन, प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली कारखाना प्रगतीपथाकडे वाटचाल करीत आहे असे त्यांनी सांगितले.

सावंत म्हणाले की, हनुमंत आसबे व सुहानी यांच्या हस्ते धार्मिक विधी झाला. यानंतर यांत्रिक कळ दाबून रोलर बसविण्याच्या कामास प्रारंभ करण्यात आला. कारखान्याचे ऊस तोडणी व वाहतूक करारही पूर्ण झाले असून मागील वर्षाचे कमिशन व देय बिलाचे वाटप झाले आहे असे व्हा. चेअरमन सावंत यांनी सांगितले. यावेळी जनरल मॅनेजर बाळासाहेब शिंदे, श्रीपती माने, रामचंद्र जाधव, चंद्रकांत देवकर, तानाजी चव्हाण, वर्क्स मॅनेजर नानासाहेब पोकळे, एचआर मॅनेजर संजय राठोड, मुख्य शेतकी अधिकारी शिवाजी चव्हाण, शेतकी अधिकारी कृष्णदेव लोंढे, शेतकी अधिकारी रमेश पवार, सिद्धेश्वर लवटे, देवानंद पासले, शंकर पाटील, गजानन माने-देशमुख, केदार साबणे, योगेश डोके, प्रकाश कमळे, अभिजीत पवार आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here