सोलापूर : येथील शंकरनगर-अकलूज सहकार महर्षि शंकरराव मोहिते- पाटील सहकारी साखर कारखान्याने गळीत हंगाम २०२५-२६ करीता बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर, ऊस तोडणी यंत्र यांचे तोडणी वाहतूक करारांचा प्रारंभ जयसिंह शंकरराव मोहिते-पाटील यांच्या हस्ते कारखाना कार्यस्थळावर करण्यात आला. आगामी हंगामात कारखान्याने ९ लाख टन ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदारांनी जास्तीत जास्त तोडणी वाहतुकीचे करार करून गाळप हंगामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कारखान्याचे अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांनी यावेळी केले.
याप्रसंगी कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, संचालक सतीश शेंडगे, नानासाहेब मुंडफणे, अमरदीप काळकुटे, सुभाष कटके, कार्यलक्षी संचालक रणजित रणनवरे व शिवसृष्टी किल्ला व शिवछत्रपती मल्टिमेडीया लेजर शो कमिटी संचालक – पांडूरंग एकतपुरे, तसेच बैलगाडी, बजाट, ट्रक, ट्रॅक्टर व ऊस तोडणी यंत्राचे मालक व ठेकेदार आणि खातेप्रमुख मोठ्या संख्येने उपस्थित होते. कारखान्याकडे गेल्या हंगामात २०२४-२५ मध्ये ऊस तोडणी वाहतुकीचे काम केलेल्या वाहन मालकांची ऊस तोडणी, वाहतुकीची संपूर्ण बिले अदा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले यांनी दिली.