सोलापूर : साखर उद्योगाच्या अडचणी सोडविण्यासाठी कारखानदारांचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे

सोलापूर : लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार आ. राम सातपुते यांच्या प्रचारार्थ दोन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटण्यासाठी साखर कारखानदार रांगेत उभे राहिल्याचे चित्र दिसले. रविवारी आणि सोमवारी फडणवीस सोलापूरमध्ये होते. त्यावेळी अनेक कारखान्यांच्या चेअरमन व पदाधिकारी यांनी त्यांची भेट घेतली. काही कारखान्यांना विविध कारणांनी बँकांच्या कर्जाची गरज आहे. त्यासह विविध मुद्यांवर अनेक कारखानदारांनी फडणवीस यांच्याशी चर्चा केली.

इथेनॉल बंदी, साखर निर्यात बंदी, कारखान्यांवर झालेली कारवाई अशा अनेक कारणांबाबत कारखानदारांनी फडणीवस यांच्याशी चर्चा केली. जिल्ह्यात जवळपास ४२ साखर कारखाने आहेत. त्यातील जवळपास ३८ कारखाने दरवर्षी हंगामात गाळप करतात. त्यातील अनेक कारखानदार अडचणीत आहेत. त्यांच्याशी चर्चेवेळी फडणवीसांनी कारखान्याला मदत करू, पण तुम्ही आम्हाला लोकसभा निवडणुकीत मदत करा, अशी अट ठेवली. काही कारखान्यांवर कारवाई करण्यात आली आहे. या सर्व कारखानदारांनी फडणवीस यांच्याकडे मदत मागितली. फडणवीस यांनी आम्ही तुम्हाला मदत करतो, तुम्ही लोकसभा निवडणुकीत मदत करा, अशी अट ठेवली. त्यामुळे विरोधी गटातील साखर कारखानदारांची कोंडी झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here