सोलापूर : सहकार महर्षी कारखान्यामध्ये गळीत हंगाम सन २०२४-२५ मधील डिस्टिलरी व अॅसिटिक अॅसिड प्रकल्प उत्पादनाचा प्रारंभ अध्यक्ष जयसिंह मोहिते-पाटील यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी माजी मंत्री विजयसिंह मोहिते- पाटील प्रमुख उपस्थित होते. संचालक संग्रामसिंह जहागीरदार व याज्ञसेनादेवी जहागीरदार या उभयतांच्या हस्ते श्रीसत्यनारायण महापूजा करण्यात आली.
या कार्यक्रमाला कारखान्याचे उपाध्यक्ष शंकरराव माने-देशमुख, संचालिका स्वरूपाराणी मोहिते-पाटील, संचालक लक्ष्मण शिंदे, नानासाहेब मुंडफणे, रामचंद्र सिद, विराज निंबाळकर, रावसाहेब पराडे, डॉ. सुभाष कटके,रामचंद्र ठवरे, तज्ञ संचालक प्रकाशराव पाटील, रामचंद्रराव सावंत पाटील, कार्यकारी संचालक राजेंद्र चौगुले व खातेप्रमुख, कामगार उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.