सोलापूर : करमाळा तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची २१ संचालकांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सोमवारपासून (ता. १०) सुरवात झाली असून, पहिल्या दिवशी २० इच्छुक उमेदवारांनी अर्ज खरेदी केले आहेत. बंद अवस्थेतील आदिनाथ कारखान्यावर सध्या प्रशासक आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अमोलसिंह भोसले व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार शिल्पा ठोकडे या काम पाहात आहेत.
कारखाना गेली सात ते आठ वर्षांपासून बंद आहे. राज्य सहकारी बँक, एनसीडीसी व इतर बँकांचे कर्ज आहे. कामगारांचे पगार थकले आहेत. विद्यमान आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप, माजी आमदार संजय शिंदे, भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष रश्मी बागल यांचे कार्यकर्ते निवडणूक रिंगणात उतरण्याची तयारी करत आहेत. आमदार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्यांची सोमवारी (ता. 10) जेऊर येथे, माजी आमदार संजय शिंदे यांच्या कार्यकर्त्यांची करमाळा येथे तर बागल यांच्या कार्यकर्त्यांची बागल कार्यालयात बैठक घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. जगताप गटाच्या कार्यकर्त्यांनी उमेदवारी अर्ज घेण्यास सुरवात केली आहे. दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रा. रामदास झोळ यांनीही कारखान्याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र : ऊस तोडणी मशिनमालकांचा मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.