सोलापूर : लोकमंगल साखर कारखान्याने गेल्यावर्षी एफआरपीपेक्षा जास्त दर दिला. यंदा १४ लक्ष टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यावर्षीही अधिक दर देणार आहे, अशी घोषणा कारखान्याचे अध्यक्ष महेश देशमुख यांनी केली. लोकमंगल समूहाच्या बीबीदारफळ येथील लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड या साखर कारखान्याच्या रोलर पूजनाचा कार्यक्रम सोमवारी सकाळी पार पडला. कारखान्याचे अध्यक्ष देशमुख यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. लोकमंगल साखर उद्योगाच्या माध्यमातून ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना थेट कार्बन क्रेडिटचा लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात पहिल्यांदाच शेतकऱ्यांना हा लाभ मिळवून देण्यात लोकमंगल समूहाने पुढाकार घेतला आहे असे त्यांनी सांगितले.
अध्यक्ष देशमुख म्हणाले की, गतवर्षी लोकमंगल समूहाने एफआरपी पेक्षा जास्त दर उसाला दिला आहे अशी माहिती दिली. ऊस बिले देताना अडचणी आल्यानंतरही शेतकऱ्यांनी समूहाला सहकार्य केल्याबद्दल त्यांनी यावेळी शेतकऱ्यांचे आभार मानले. लोकमंगलच्यावतीने युरोपमधील एका उद्योगासोबत कार्बन क्रेडिट बाबत करार अंतिम टप्प्यात आहे. कार्बन क्रेडिटच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हातामध्ये थेट काही रक्कम मिळणार आहे असे ते म्हणाले. कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील, पराग पाटील सरव्यवस्थापक अशोक शिंदे, सरव्यवस्थापक सुनील घालमे, मुख्य शेतकरी अधिकारी ज्ञानदेव मारकड उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.