सोलापूर : पंढरपूर तालुक्यात यंदा सहा साखर कारखान्यांच्या माध्यमातून ३६ लाख मे. टन उसाचे गाळप होईल, अशी अपेक्षा आहे. तालुक्यातील विठ्ठलराव शिंदे, विठ्ठल, पांडुरंग, सहकार शिरोमणी, सीताराम आणि कृषिराज शुगर या कारखान्यांसह तालुक्याबाहेरील काही कारखान्यांच्या माध्यमातून उसाचे गाळप केले जाते. तालुक्यातील सहा कारखान्यांकडे ५४ ते ५५ हजार हेक्टर उसाची नोंद आहे, अशी माहिती कारखान्यांच्या सूत्रांनी दिली.
मागील वर्षी दुष्काळजन्य परिस्थिती याचा उसाच्या वाढीवर परिणाम झाला. कोलमडलेले उजनीच्या पाण्याचे नियोजन यामुळे पाण्याची भासत असलेल्या कमतरतेमुळे उसाचे क्षेत्र घटलेले दिसले. परंतु यंदा वरुणराजाने शेतकऱ्यांवर वेळेवर कृपादृष्टी दाखवल्यामुळे उसाचे उत्पन्न वाढले आहे. तालुक्यातील सहा कारखान्यांच्या माध्यमातुन यंदाच्या गाळप हंगामात ३६ ते ३७ लाख मे.टन गाळपाची कारखाना प्रशासनाला अपेक्षा आहे. विठ्ठलराव शिंदे युनिट २ कडे आतापर्यंत ७००० हेक्टरवरील उसाची नोंद झाली आहे. कारखान्याला साडेपाच लाख मे.टन गाळपाची अपेक्षा आहे. तर विठ्ठल कारखान्याकडे १५,२०९ हेक्टरमधील उसाची नोंद आहे. पांडुरंग कारखान्याकडे सर्वाधिक १२,००० हेक्टर तर सहकार शिरोमणी कारखान्याकडे १० हजार हेक्टर ऊस नोंद आहे. सीताराम कारखान्याकडेही १० हजार हेक्टर ऊसाची नोंद आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.