सोलापूर : श्रीपूर येथील कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात एका दिवसात विक्रमी ९२१० मे. टन उसाचे गाळप केले. कारखान्याचा गाळप हंगाम चालू होऊन साधारण तीन आठवडे होत आहेत. याकालावधीत कारखान्याने आजपर्यंत एक लाख ५९ हजार ८४८ मे. टन उसाचे गाळप करीत सरासरी १०.१२ टक्के साखर उताऱ्याने एक लाख ४१ हजार ३० साखर पोत्यांचे उत्पादन केले आहे.
चालू गळीत हंगामाचा विचार करता कर्मयोगी कारखाना १२ लाख मे. टन उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याची गाळप क्षमता ८५० मे. टन आहे. परंतु कारखान्याने सुरुवातीपासूनच ऊस गाळपाचे सातत्य राखत आज एकदिवसीय सर्वोच्य गाळप केले आहे. याबरोबरच केंद्र सरकारने इथेनॉलनिर्मितीस परवानगी दिल्याने ज्यूस ते इथेनॉलनिर्मिती करत एक्सपोर्ट होणाऱ्या पहिल्या टँकरचे पूजन कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांच्या हस्ते करून टँकर रवाना करण्यात आला.
कारखान्याचे कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी म्हणाले कि, कर्मयोगी कारखान्याचे अभ्यासू चेअरमन प्रशांत परिचारक, उपाध्यक्ष कैलास खुळे व सर्व संचालक यांचे मार्गदर्शन, अधिकारी व कामगार यांचे सामूहिक प्रयत्न व सर्वात महत्त्वाचे म्हणजे कारखान्याचे संस्थापक कै. सुधाकरपंत परिचारक यांच्या ‘शेतकरी हिताय व कामगार सुखाय’ या उक्तीचा आदर्श पुढे ठेऊन आम्ही काम करत आहोत. त्यामुळे व्यवस्थापन, अधिकारी व कामगार यांच्या सामूहिक प्रयत्नांचे हे यश आहे.
यावेळी प्रोडक्शन मॅनेजर मुकुंद कुलकर्णी, मुख्य शेती अधिकारी कुमठेकर, डिस्टिलरी मॅनेजर पाटील, मुख्य अभियंते अमोल बारटक्के, मुख्य लेखापाल रवींद्र काकडे, ऊस विकास अधिकारी सोमनाथ भालेकर, परचेस मॅनेजर महेश देशपांडे, अधिकारी तानाजी भोसले, हणमंत नागणे, सचिन विभुते, समिर सय्यद, सोपन कदम, तेजस जाधव आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.