सोलापूर, कोल्हापूर जिल्हे ऊस क्षेत्रात आघाडीवर

कोल्हापूर : देशात आणि राज्यात दरवर्षी ऊस आणि साखर उत्पादनाचे नवनवे उच्चांक प्रस्थापित केले जात आहेत. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये तर ऊस उत्पादनात अक्षरशः चढाओढ लागलेली आहे. महाराष्ट्रात ऊस क्षेत्रात सोलापूर, कोल्हापूर आणि अहमदनगर हे तीन जिल्हे अनुक्रमे पहिल्या तीन क्रमांकावर आहेत. विशेष म्हणजे पहिल्या क्रमांकावरील सोलापूर आणि दुसऱ्या क्रमांकावरील कोल्हापूरच्या ऊस क्षेत्रात सुमारे ५० हजार हेक्टरपेक्षा जास्त अंतर आहे. अन्य जिल्ह्यात उसाचे क्षेत्र घटले असले तरी कोल्हापूर विभागात उसाच्या क्षेत्रात १७ हजार ८०७ तर सोलापूर विभागात ११ हजार ७०७ हेक्टरने वाढ झालेली दिसते.

सोलापूरमध्ये उसाचे सर्वाधिक २,४०,९५७ हेक्टर क्षेत्र आहे. जिल्ह्यातील साधारणपणे ३७ कारखाने गाळप हंगामात सहभागी होतात. २०२२-२३ चा गळीत हंगामात राज्यात १४ लाख ८७ हजार ८३६ हेक्टर क्षेत्रातील उसाचे गाळप होऊन १०५३.९१ लाख टन साखर उत्पादन झाले होते. यंदा राज्यात १४ लाख ३७ हजार २१ हेक्टर क्षेत्रातील ऊस गाळपास उपलब्ध आहे. प्रादेशिक सहसंचालक (साखर) व गेल्या हंगाम कृषी विभाग यांनी संयुक्तपणे १४ लाख ८३ हजार ७९२ हेक्टर उसाचे क्षेत्र हेक्टर उसाचे क्षेत्र यावर्षी राज्यात गाळपासाठी निश्चित केले आहे.

पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, हजार नांदेड, अमरावती व नागपूर या विभागात उसाचे क्षेत्र घटले आहे. अहमदनगर विभागात सर्वाधिक २५,८११ हेक्टरची घट झाली आहे. त्यानंतर नांदेड विभागात २२,४७१ हेक्टर, औरंगाबाद विभागात १४,०७९ हेक्टर, पुणे विभागात १४,०३२ हेक्टर, अमरावती विभागात दोन हजार ६७१ हेक्टर तर नागपूर विभागात एक हजार २६४ हेक्टर उसाचे क्षेत्र कमी आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here