सोलापूर:कुर्डुवाडी पंचायत समितीत स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कृषी दिन कार्यक्रमात ‘कृषी संजीवनी’ सप्ताहाचा समारोप करण्यात आला. यावेळी प्रगतशील शेतकरी पांडुरंग बोबडे यांनी ‘सेंद्रीय शेतीबाबत विषमुक्त शेती कशा पद्धतीने करावी’ याविषयी मार्गदर्शन केले.’एकरी शंभर टनाचे ऊस उत्पादन कसे घ्यावे’ याबाबत सोमनाथ हुलगे यांनी मार्गदर्शन केले.सुशिक्षित बेरोजगारांना ‘शेती क्षेत्रामधील विविध संधी’ या विषयावर ‘युवा शेतकरी’ पुरस्कारप्राप्त महेश पाटील यांनी मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला प्रगतशील शेतकरी, पीक स्पर्धा विजेते शेतकरी, फळ बागायतदार उपस्थित होते.
बाजार समितीचे संचालक अनुभुले यांनी कृषी विभागाच्या उत्कृष्ट कामाचे कौतुक केले.’शेतीनिष्ठ’ पुरस्कार प्राप्त शेतकरी सोपान हुलगे (बेंबळे), ‘सेंद्रिय शेती’ पुरस्कारप्राप्त शेतकरी पांडुरंग बोबडे(लोंढेवाडी) यांचा कार्यक्रमात सत्कार करण्यात आला.गटविकास अधिकारी महेश सुळे, तालुका कृषी अधिकारी बी.डी.कदम, बाजार समितीचे संचालक संतोष अनभुले, माजी उपसभापती धनाजी जवळगे, पंचायत समिती कृषी अधिकारी शंकर मिरगणे, योगेश गोरे, धनंजय मिसाळ, मंडल कृषी अधिकारी जाधव, मस्तूद, आत्मा कृषी विभागाचे झिने, घोडके, सर्व कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक, पाणी फाउंडेशनचे सुतार उपस्थित होते. संजय पाटील यांनी आभार मानले.