सोलापूर : गत वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीमुळे जिल्ह्यामध्ये ऊसाचे उत्पादन घटल्याने यंदाचा गळीत हंगाम लवकर पूर्ण झाला असून या हंगामात कारखान्याने ८० हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप केल्याचे कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार ॲड. धनाजीराव साठे यांनी सांगितले. कुर्मदास सह. साखर कारखान्याच्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभकार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कारखान्याचे मुख्य शेती अधिकारी प्रकाश गोविंदराव शिंदे व त्यांच्या पत्नी सुरेखा शिंदे यांच्या हस्ते काटा व श्री सत्यनारायण पुजा करण्यात आली.
यावेळी ॲड. धनाजीराव साठे म्हणाले, सर्वांच्या सहकायनि हंगामामध्ये विविध अडचणीतून मार्ग काढीत कारखान्याचा हंगाम सुरळीत पार पाडला, कारखान्याच्या या हंगामात कारखान्याकडे नोंदलेल्या सभासद, बिगर सभासदांच्या ऊसाचे गाळप करून एकुण ८० हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक बी.डी. पाटील, संचालक शशिकांत देशमुख, मधुकर चव्हाण, सिराज शेख, विजयसिंह पाटील यांच्यासह कारखान्याचे सर्व पदाधिकारी, कर्मचारी सभासद, ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार उपस्थित होते.