सोलापूर : लक्ष्मीनगर-अनगर येथील लोकनेते बाबुराव पाटील साखर कारखान्याच्या २१ व्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ पीरटाकळी येथील शेतकरी विलास धुमाळ व त्यांच्या पत्नी कांचनताई धुमाळ या उभयतांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्रथेप्रमाणे आणि परंपरेप्रमाणे विधिवत पूजन करून बॉयलर प्रदीपन द्वारे गळीत हंगामाचा शुभारंभ केला.
यावेळी संस्थापक अध्यक्ष राजन पाटील, चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, कार्यकारी संचालक ओमप्रकाश जोगदे, संचालक प्रकाश चवरे, शुक्राचार्य हावळे, सुधीर पवार, संभाजी चव्हाण, अशोक चव्हाण, माजी चेअरमन हनुमंत पोटरे, संदीप पवार, मदनसिंह पाटील, बाजार समिती व्हाईस चेअरमन दत्ताराज पवार, गिड्डेवाडीचे सरपंच अतुल जगताप उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.