सोलापूर : ऊस उत्पादक शेतकरी यांना होणेसाठी ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित भविष्यातील ऊस शेती या विषयावर अग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्ट, कृषी विज्ञान केंद्र, बारामती यांचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. विवेक भोईटे यांच्या परिसंवादाचे १६ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील सहकारी साखर कारखाना, मुख्य कार्यालय उदय सभागृह येथे आयोजन करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील यांनी दिली.
ऊस उत्पादन वाढीसाठी आर्टिफिशीयल इंटेलिजेन्स (ए.आय.) तंत्रज्ञानाचा वापर देशात सर्वप्रथम कृषी विज्ञान केंद्र, बारामती येथे करण्यात आला. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सिझन २०२४-२५ मध्ये प्रती एकरी ३० ते ३५ टक्के इतके उत्पादन वाढून मिळाले आहे. कारखाना कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतकरी यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख होणेकरीता कारखान्याचे मार्गदर्शक संचालक व राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व चेअरमन जयसिंह मोहिते-पाटील नेहमीच आग्रही असतात. परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी, सभासद व बिगर सभासद यांनी सदर परिसंवादास उपस्थित राहण्याचे आवाहन कारखान्याचे कार्यकारी संचालक राजेंद्र केरबा चौगुले यांनी केले आहे.