सोलापूर : येथील संतनाथ सहकारी साखर कारखान्याला गुरुवारी दुपारी भीषण आग लागून कारखान्यातील दप्तर, गोडावून, मशिनरी, साहित्य आगीत भस्म झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. गेल्या अनेक वर्षापासून कारखाना बंद आहे. वाळलेले गवत व उन्हाची तीव्रता यामुळे आग कारखान्याच्या आतमध्ये शिरली.
कारखान्यातील अकौंटंट, केनियार्ड, गेस्ट हाऊस, स्टोअर, मुख्य गाळप मशिनरी या परिसरात आगीने मोठा पेट घेतला. या आगीत लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याच्या प्राथमिक अंदाज आहे. अथक प्रयत्नानंतर भीषण आग आटोक्यात आणण्यात यश मिळवले आहे. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महत्त्वाच्या बातम्या:
महाराष्ट्र: राज्यातील १३०० ऊस तोडणी यंत्र मालकांचा विविध मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा
साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.