सोलापूर : माजी गृह राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्याशी संबंधित असलेल्या मातोश्री साखर कारखान्याने शेतकऱ्यांच्या ऊसाची बिले थकवली आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी सोलापूरमध्ये काँग्रेस भवन कार्यालयसमोर बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे. आंदोलनात सहभागी झालेले शेतकरी धाराशिव जिल्ह्यातून आले आहेत.
मातोश्री साखर कारखान्याकडील ही ऊस बिले मागील अनेक महिन्यांपासून थकीत आहेत. शेतकऱ्यांनी ही बिले मिळावीत यासाठी वेळोवेळी आंदोलनेही केली. सततच्या आंदोलनानंतरही कारखान्याच्या व्यवस्थापनाने ऊस बिल देण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोलापुरातील काँग्रेसच्या मुख्य कार्यालयासमोर आंदोलन करण्याची भूमिका घेतली. गेल्या बारा तासांपासून शेतकरी काँग्रेस भवनसमोर उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत बिले मिळत नाहीत, तोपर्यंत जागेवरून हटणार नाही, आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.