सोलापूर : म्हैसगाव (ता. माढा) येथील ओंकार शुगर कॉर्पोरेशन युनिट क्रमांक सहामध्ये २०२४-२५ हंगामासाठी गळितास येणाऱ्या उसास प्रति मे. टन तीन हजार एक रुपये दर देणार आहे. गळितास येणाऱ्या उसाच्या प्रमाणात दिवाळीला मोफत साखर देणार असल्याचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांनी जाहीर केले.
ते म्हणाले, पहिला हप्ता २८०० रुपये व दिवाळीत २०१ रुपये असे एकूण ३००१ रुपये प्रति मे. टन दिले जाणार आहेत. शेतकरी व ऊस वाहतूक कंत्राटदारांचे पेमेंट वेळेवर दिले जाणार आहे. कामगारांचे पगार, मालपुरवठादार, व्यापाऱ्यांची वेळेवर देणी देणार आहे. अल्पावधीत ओंकार ग्रुपने नावलौकिक कमावल्याने बँका आर्थिक सहकार्य करायला तयार असतात, असेही बोत्रे- पाटील यांनी सांगितले.
प्रास्ताविकात जनरल मॅनेजर रामचंद्र मखरे यांनी ऊसदराबाबत माहिती दिली. यावेळी जनरल मॅनेजर प्रशासन वैभव काशीद, वर्क्स मॅनेजर रविराज भोसले, केन मॅनेजर सुनील बंडगर, डिस्टिलरी मॅनेजर अनिल शेळके, प्रॉडक्शन मॅनेजर अशोक खाडे, दिलीप उबाळे, सतीश पाटील, शिवाजी राऊत, महादेव उबाळे, केशव गवळी, शिवाजी कोकरे, सतीश पवार, जोतिराम पवार, पांडुरंग जाधव, सुनील कांबळे, दीपक केचे, संजय माने, सतीश हेगडकर, रोहिदास ढोरे, रफिक कोरबू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, ऊस उत्पादक शेतकरी व वाहतूक कंत्राटदार उपस्थित होते.