सोलापूर : ओंकार साखर कारखाना परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकीत अग्रेसर राहण्याचा प्रयत्न केला आहे. ओंकार साखर कारखाना परिवाराचे चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील, संचालिका रेखाताई बोत्रे-पाटील, संचालक प्रशांतराव बोत्रे-पाटील, ओमराजे बोत्रे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वन विभागाला दोन जीप गाड्यांची भेट देण्यात आली.
ऊस बागायत पट्ट्यात बिबट्या, तरस यांनी उच्छांद मांडला आहे. त्यामुळेच शेतकरीवर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हे बिबटे व तरस पाळीव प्राण्यांवर हल्ला करून मारून टाकतात. शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. याची जाणीव झाल्याने वनविभागाकडे अत्याधुनिक रात्रीच्या गस्त घालण्यासाठी व वेळेत घटनास्थळी पोहचण्यासाठी गाड्या असाव्यात. या उद्देशातून दोन महिंद्रा कंपनीच्या बोलेरो गाड्या ओंकार परिवाराकडून चेअरमन बाबूराव बोत्रे-पाटील यांच्या हस्ते मुख्य वनरक्षक तुषार चव्हाण, उपवनरक्षक पंकज गर्ग, सोलापूर वन विभाग राम धोत्रे, सामाजिक वनीकरणाच्या स्नेहल पाटील यांना भेट देण्यात आल्या. ओंकार साखर कारखान्याचे जनरल मॅनेजर वैभव काशीद, वन विभागाचे अधिकारी, कर्मचारीवर्ग उपस्थित होते.