सोलापूर: पांडुरंग साखर कारखाना उताऱ्यात जिल्ह्यात अव्लल

सोलापूर : जिल्ह्यातील पांडुरंग साखर कारखान्याने या हंगामात ११.३० टक्के साखर उताऱ्यासह जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. कारखाना प्रशासन उर्वरीत उसाची तोडणी लवकरात लवकर करण्याची तयारी करत आहे असे कारखान्याचे अध्यक्ष, आमदार प्रशांत परिचारक यांनी सांगितले. चालू गळीत हंगामात कारखान्यात उत्पादित झालेल्या ९ लाख ११११ व्या साखर पोत्याचे पूजन अध्यक्ष परिचारक यांच्या हस्ते करण्यात आले.

पांडुरंग साखर कारखान्याने अवघ्या १२४ दिवसांत ८,३१,६६७ लाख टन उसाचे गाळप केले आहे. आणि ९ लाख ११११ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याच्या कार्यक्षेत्रात अद्याप २ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध आहे. कारखाना २५ मार्चपर्यंत सर्व ऊसाची तोडणी होईपर्यंत सुरू राहणार आहे. दरम्यान, यावेळी वसंत देशमुख, दिनकर नाईकनवरे, कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी, जयश्री व्हरगर, विवेक कचरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here