सोलापूर : श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना आणि श्री विठ्ठल प्रशालेच्या परिसरात कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांच्या ४१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून वृक्षारोपण करण्यात आले. वाढदिवसाचे औचित्य साधून जागतिक पर्यावरण दिन (५ जून) ते स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट) पर्यंत दहा हजार रोपांची वृक्ष लागवड कारखाना परिसरात करण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. आतापर्यंत पाच हजार वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. ‘एक विद्यार्थी, एक झाड’ ही संकल्पना राबविण्यात येत असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.
प्रादेशिक वनविभागाचे वनपाल बापूसाहेब भोई, तुकाराम दिघे, समाजसेविका ज्योती कुलकर्णी यांच्या हस्ते वृक्षारोपणाचा उपक्रम पार पडला. प्र. कार्यकारी संचालक डी. आर. गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. उपस्थित प्रत्येक विद्यार्थ्याच्या हस्ते वृक्षारोपण करुन झाड जतन करण्याची प्रतिज्ञा करण्यात आली. कार्यक्रमास व्हा. चेअरमन प्रेमलता रोगे, संचालक संभाजी भोसले, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, धनंजय काळे, नवनाथ नाईकनवरे, प्रविण कोळेकर, विठ्ठल रणदिवे, दशरथ जाधव, प्राचार्य विठ्ठलराव नागटिळक, पर्यवेक्षक राजेंद्र डोंगरे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.