सोलापूर : श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यावर सुरक्षा सप्ताहास प्रारंभ

सोलापूर : सहकारमहर्षी गणपतराव साठेनगर पडसाळी येथील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखान्यावर ज्येष्ठ कर्मचारी अंकुश पाटोळे यांच्या हस्ते राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ करण्यात आला. सेक्रेटरी चंद्रहास गायकवाड म्हणाले कि, औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेतेला फार महत्त्व आहे. सुरक्षेतेचे नियम केवळ या सप्ताहापुरतेच मयदित न ठेवता कायमस्वरूपी सुरक्षा नियमांचे पालन करावे. त्यांनी अपघात विरहीत काम करून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले.

यावेळी सुरक्षा अधिकारी यांनी सर्व कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली. यावेळी कारखान्याचे सेक्रेटरी चंद्रहास गायकवाड, चीफ अकाउंटंट रावसाहेब दुधाणे, चीफ केमिस्ट विजय सावंत, डेप्युटी चीफ केमिस्ट सुनील बाळसराफ, ऊस पुरवठा अधिकारी श्रीकांत करळे, इलेक्ट्रीक इंजिनिअर राहुल जमदाडे, सुरक्षा अधिकारी नागनाथ लोकरे, टाईम किपर सिद्धेश्वर बिलगे उपस्थित होते.

 

महत्त्वाच्या बातम्या:

पुणे – माळेगाव कारखान्याचा दुसरा हप्ता ३३२ रुपये : अध्यक्ष केशवराव जगताप

 

साखर उद्योगाशी संबंधित चालू घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here