सोलापूर : श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याने मागील हंगामातील सर्व देणी देऊन एफआरपीपेक्षा जादा ऊस दर दिला. कामगारांचा थकीत ३२ महिन्यांचा प्रॉव्हिडंट फंड भरुन पगार वेळवर केला. गाळप हंगामासाठी पूर्ण क्षमतेने तोडणी वाहतूक यंत्रणा भरती केली असून आसपासच्या इतर कारखान्यांच्या बरोबरीने ऊसदर देण्यास संचालक मंडळ कमी पडणार नाही. या हंगामात संचालक मंडळाने ५ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे, असे प्रतिपादन चेअरमन शिवानंद पाटील यांनी केले. श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याचा सन २०२४-२५ सालचा ३२ वा गळीत हंगाम शुभारंभ उत्साहात झाला. यावेळी ते बोलत होते.
यावेळी ऊस पुरवठा केलेले सभासद शेतकरी रोहित गावडे, सिध्दाराम चौगुले, अनिल चौगुले, सावित्री शेट्टी, सुरेश कलुबर्मे, सिध्दराया चौगुले, प्रताप रोकडे, प्रवीण जाधव, नितीन भोसले, बाळासोा चव्हाण या शेतकऱ्यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार हे होते. संचालक भिवा दाजी दोलतडे व त्यांच्या पत्नी इंदुबाई यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा करण्यात आली. प्र. कार्यकारी संचालक रमेश जायभाय यांनी प्रास्तविक केले. माजी चेअरमन अॅड. नंदकुमार पवार यांचे भाषण झाले. कारखान्याचे व्हाईस चेअरमन तानाजी खरात, संचालक मुरलीधर दत्तू, गौरीशंकर बुरकूल, गोपाळ भगरे, राजेंद्र चरणुकाका पाटील, भारत बेदरे, दयानंद सोनगे, औदुंबर वाडदेकर, रेवणसिध्द लिगाडे, भिवा दोलतडे, बसवराज पाटील, गौडाप्पा बिराजदार, दिगंबर भाकरे, महादेव लुगडे, तानाजी कांबळे यांच्यासह तालुक्यातील विविध पदाधिकारी, सभासद शेतकरी, खाते प्रमुख, विभागप्रमुख, कामगार उपस्थित होते.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.