सोलापूर : वेणूनगर-गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना यंदा १२.१० लाख मे. टन उसाचे गाळप करणार आहे. कारखान्याकडे यंदाच्या हंगामात गळितासाठी ४० हजार १४५ एकर उसाची नोंद झाली आहे. ऊस उत्पादक सभासद, शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप करण्यासाठी तोडणी, वाहतूक यंत्रणेचे नियोजन केले आहे. चेअरमन अभिजीत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने गत दोन गळीत हंगाम उच्चांकी ऊस गाळप केले आहे. कारखाना, सहप्रकल्प पूर्ण क्षमतेने चालविण्याचे नियोजन आहे, अशी माहिती कारखान्याचे जनरल मॅनेजर डी. आर. गायकवाड यांनी दिली. कारखान्याचा ४३ वा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ गुरुवारी सकाळी हभप मोहन महाराज पाटील यांच्या हस्ते झाला. त्यावेळी गायकवाड बोलत होते.
कार्यकारी संचालक रवींद्र पाटील व जयश्री पाटील या उभयतांच्या हस्ते होमहवन पूजा झाली. प्रा. डॉ. बी. पी. रोंगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास संचालक संभाजी भोसले, कालिदास पाटील, दिनकर चव्हाण, सुरेश भुसे, बाळासाहेब हाके, धनंजय काळे, साहेबराव नागणे, कालिदास साळुंखे, सचिन वाघाटे, जनक भोसले, प्रवीण कोळेकर, नवनाथ नाईकनवरे, दत्तात्रय नरसाळे, सीताराम गवळी, अशोक जाधव, सिध्देश्वर बंडगर, कलावती खटके, सविता रणदिवे, दशरथ जाधव, अशोक तोंडले, तुकाराम मस्के, धनाजी खरात, उमेश मोरे, अंगद चिखलकर, अशोक घाडगे, गणेश ननवरे, समाधान गाजरे, क्रांती दत्तू आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.