विधानसभा निवडणूक : सोलापूरच्या साखरपट्ट्यात साखर कारखानदारांनी ठोकला शड्डू!

सोलापूर : मंगळवारी विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजला. आता निवडणूक रणधुमाळीला गती आली आहे. राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीनुसार होणारी विधानसभा निवडणूक ही सोलापूर जिल्ह्यात सर्वच राजकीय पक्षांची कसोटी पाहाणारी ठरणार आहे. २०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदार संघापैकी पाच मतदारसंघात भाजपचे तर दोन मतदारसंघात राष्ट्रवादीचे वर्चस्व पाहायला मिळाले. बार्शी व करमाळा मतदारसंघात अपक्षांनी तर सांगोल्यात शिवसेना आणि शहर मध्य मतदारसंघात काँग्रेसने बाजी मारली होती. पश्चिम महाराष्ट्राच्या राजकारणात साखरपट्ट्याला आजवर कायम महत्त्व राहिले आहे. त्यामुळे यंदाची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची तर काँग्रेस, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस, उद्धव ठाकरे यांची शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना यांच्या अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.

महाविकास आघाडी व महायुतीच्या जागांचे वाटप अद्यापही जाहीर झाले नाही. त्यामुळे जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघापैकी महाविकास आघाडीत व महायुतीत कोणता विधानसभा मतदारसंघ कोणाला सुटणार आणि किती जण बंडखोरी करणार? हे उमेदवारी जाहीर झाल्यानंतर स्पष्ट होईल. खरेतर राज्यातील सत्तेच्या केंद्रस्थानी असणारा सोलापूर जिल्हा कायम खासदार शरद पवार यांच्या पाठीशी उभा राहिला. मात्र केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर जिल्ह्याची राजकीय समीकरणे बदलली. आता शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पडलेले दोन गट, लोकसभा निवडणुकीत भाजपची पीछेहाट, ओबीसींसह मराठा आरक्षणाचा कळीचा मुद्दा या पार्श्वभूमीवर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत बदलत्या राजकीय समीकरणाचा कोणत्या पक्षाला फायदा होणार याची उत्सुकता आहे.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here