सोलापूर : पांडुरंग कारखान्याकडून सणासाठी प्रती टन ५० रुपयांप्रमाणे ऊस बिल जमा

सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याने परंपरेप्रमाणे पोळा सणासाठी गळीत हंगाम २०२३ २४ मध्ये गाळप झालेल्या उसास प्रति मे. टन रु. ५० प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. कारखान्याचे चेअरमन प्रशांत परिचारक यांनी माहिती दिली. कारखान्याचे संस्थापक-चेअरमन स्व. सुधाकरपंत परिचारक यांनी घालून दिलेल्या परंपरा कारखान्याने जपली आहे, असे यावेळी कारखाना प्रशासनाने सांगितले.

याबाबत कार्यकारी संचालक डॉ. यशवंत कुलकर्णी यांनी सांगितले की, कारखान्याने गळीत हंगाम २०२३-२४ मध्ये गाळप केलेल्या उसास प्रति मे. टन रु. २८०० प्रमाणे रक्कम अदा केली आहे. त्याचप्रमाणे आज प्रति मे. टन रुपये ५० प्रमाणे ऊस बिल बँकेत वर्ग केले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आतापर्यंत २८५० प्रमाणे प्रति मे. टन ऊस बिलाची रक्कम मिळाली आहे. कारखान्याने ऊस उत्पादकांना एफआरपीपेक्षाही प्रति मे. टन रु. ३४९ जादा अदा केलेले आहेत. गळीत हंगाम २०२४-२५ सुरू करण्याच्यादृष्टीने सर्व कामे पूर्ण झाली असून कारखाना गाळपास सज्ज झाला आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन कैलास खुळे, संचालक दिनकर मोरे, वसंतराव देशमुख, उमेशराव परिचारक, दिलीपराव चव्हाण, ज्ञानदेव ढोबळे, तानाजी वाघमोडे, बाळासाहेब यलमर, भगवान चौगुले, लक्ष्मण धनवडे, भास्कर कसगावडे, भैरू वाघमारे, गंगाराम विभुते, सुदाम मोरे, विजय जाधव, हनुमंत कदम, किसन सरवदे,दाजी पाटील, दिलीप गुरव, सीताराम शिंदे, शामराव साळुंखे, राणू पाटील आदी उपस्थित होते.

साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here