सोलापूर : जकराया साखर कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाला प्रारंभ

सोलापूर : जकराया साखर कारखान्याने चालू गळीत हंगामासाठी सहा लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना यंदा जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष अॅड. बी. बी. जाधव यांनी केले. वटवटे (ता. मोहोळ) येथील कारखान्याच्या चौदाव्या गळीत हंगामाचा शुभारंभ व बॉयलर अग्निप्रदीपन प्रसंगी ते बोलत होते. उमादेवी जाधव, जकराया शुगरचे कार्यकारी संचालक सचिन जाधव, पूर्णवेळ संचालक राहुल जाधव, माजी सभापती बाबासाहेब क्षीरसागर, डॉ. बाळासाहेब सरवळे, श्रीधर माने, अंकुश आवताडे, प्रमोद आवताडे, ज्ञानेश्वर पाटील आदी उपस्थित होते.

संचालक राहुल जाधव व प्रियांका जाधव व वांगी येथील सभासद बनसिद्ध जवळकोटे व शांताबाई जवळकोटे या दांपत्याच्या हस्ते विधिवत पूजा करून कारखाना बॉयलरचा अग्निप्रदीपन व गाळप हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. कार्यकारी संचालक सचिन जाधव यांनी सांगितले की, कारखान्याची सर्व यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज आहे. ऊस हंगामासाठी दोनशे ट्रॅक्टर, तीनशे बैलगाडी, दीडशे डंपिंग ट्रॅक्टर यांच्याशी करार करण्यात आले आहेत. सभासदांना नेहमीप्रमाणे योग्य व वेळेत दर देण्याबाबतची परंपरा अखंडितपणे राबविली जाईल. सभासदांनी ऊस देऊन कारखान्याला सहकार्य करण्याचे आवाहन केले. चंद्रकांत सरवळे, भानुदास गावडे, नामदेव गायकवाड, रफिक पाटील, प्रभाकर पाटील, सिद्धेश्वर मोरे, दीपक माने, बसवेश्वर पुजारी, रघुनाथ होनराव, समाधान महाडकर, अण्णासाहेब पाटील, ब्रह्मदेव पुजारी आदी उपस्थित होते. देविदास नाईकनवरे यांनी सूत्रसंचालन केले.

साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here