सोलापूर : सिकंदर (ता. मोहोळ) येथील भीमरावदादा महाडिक सहकारी साखर कारखान्याच्या ४९ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गतवर्षी मंजूर झालेल्या पहिलवान भीमरावदादा महाडिक सहकारी साखर कारखाना या नाम बदलास हात उंचावून सर्व सभासदांनी मंजुरी दिली. सभेत विविध चार ठराव घेण्यात आले. गतवर्षीच्या हंगामातील शेवटच्या पंधरवड्यातील कारखान्याकडे आलेल्या उसाचे बिल देणे बाकी असून, गेल्या आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या खात्यावर बिलाची रक्कम जमा करण्यात येत आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
प्रारंभी स्वर्गीय भीमरावदादा महाडिक यांच्या प्रतिमेचे पूजन खा. महाडिक यांच्या हस्ते करण्यात आले. संचालक सुनील चव्हाण यांनी स्वागत केले. कार्यकारी संचालक सूर्यकांत शिंदे यांनी अहवाल व विषय वाचन केले. शिवाजी शेंडगे यांनी सूत्रसंचालन केले. आभार तात्या नागटिळक यांनी मानले. चेअरमन विश्वराज महाडिक, कार्यकारी संचालक एस. जे. शिंदे, संचालक सुनील चव्हाण, तात्यासाहेब. नागटिळक, सिद्राम मदने, संभाजी कोकाटे, बिभीषण वाघ, संतोष सावंत, बाळासाहेब गवळी, राजेंद्र टेकाळे, चंद्रसेन जाधव, रामहरी रणदिवे, संतोष सावंत, सिद्राम मदने, अॅड. रामलिंग कोष्टी, सुधीर भोसले, छगन पवार, संग्राम चव्हाण, राजाराम बाबर, भारत पाटील, झाकीर मुलाणी आदी उपस्थित होते.