सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सह. साखर कारखान्याने हंगाम २०२३-२४ मध्ये अडचणींवर मात करीत कारखाना अव्वल क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न केला आहे. पिंपळनेर आणि करकंब या दोन्ही युनिटने मिळून २५ लाख मे. टन उसाचे गाळप केले असून आगामी हंगामात दोन्ही युनिटचे मिळून २६ लाख मे. टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष व आ. बबनदादा शिंदे यांनी केले. गंगामाईनगर, पिंपळनेर येथे कारखान्याच्या सन २०२४-२५ मधील २४ व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभात ते बोलत होते.
संचालक सचिन देशमुख व त्यांच्या सुविद्य पत्नी सोनाली यांच्या हस्ते श्री सत्यनारायण महापूजा झाली. सुरेश पाठक यांनी पौरोहित्य केले. कारखान्याचे अध्यक्ष आ. बबनदादा शिंदे म्हणआले की, गेल्यावेळी प्रती टन २९५० रु. भाव दिला आहे. या हंगामात शेतकऱ्यांनी गडबड करू नये, थोडे थांबावे. ऊस इतरत्र देऊ नये. माझा माळेगाव, सोमेश्वरपेक्षा जास्त दर देण्याचा मानस आहे. ऊसतोडणी मजूर टोळ्यांचे एक बाजूचे भाडेही देण्याचा निर्णय विचाराधीन आहे. यंदा ऊस भरपूर आहे. चांगला दर व सेवा देतो म्हणून सर्वांना येथेच ऊस द्यावा, असे वाटते. भविष्यात व्याजाचा भुर्दंड कमी होईल. कारखाना सतत वाढत असल्याने खर्च करावा लागतो. साखर क्वालिटी सुधारण्यावर भर राहणार आहे. यावेळी सुरेश बागल यांनी आभार मानले. कार्यक्रमास व्हा. चेअरमन वामनराव उबाळे, संजय पाटील-भीमानगरकर, तुकाराम ढवळे, शिवाजी पाटील, सभापती विक्रमसिंह शिंदे, सुहास पाटील – जामगावकर, रमेश येवले- पाटील, लक्ष्मण खुपसे, पोपट गायकवाड, शिवाजी डोके, वेताळा जाधव, अशोक मिस्किन, भरत चंदनकर, पांडुरंग घाडगे, प्रताप नलवडे, संतोष अनभुले, धनाजी जवळगे आदी उपस्थित होते.
साखर उद्योगाविषयी अधिक घडामोडी जाणून घेण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.