सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे युनिट नंबर एक पिंपळनेर या कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता व ७०९,५५५ व्या साखर पोत्याचे पूजन मंगळवारी संस्थापक अध्यक्ष, माजी आमदार बबनराव शिंदे यांचे हस्ते साखर कारखाना कार्यस्थळावर झाला. कारखान्याने हंगामात आजअखेर ११,१६,८१८ मे. टन उसाचे गाळप केले असून ७,१०,८०० क्विंटल साखर पोती उत्पादित केली आहेत. कारखान्याचा साखर उतारा १०.८४ टक्के इतका आहे, अशी माहिती देण्यात आली.
या हंगामात उत्पादित ७ लाख ९ हजार ५५५ व्या साखर पोत्याचे पूजन संचालक सुरेश बागल व पांडुरंग घाडगे यांचे हस्ते पार पडले. या हंगामामध्ये युनिट नंबर एकच्या डिस्टिलरी विभागाकडे शुगर सिरपपासून दोन कोटी २१ लाख बल्क लिटर इथेनॉल व दोन कोटी ७१ लाख ४७ हजार स्पिरीट उत्पादन झाले आहे. तर कारखान्याच्या युनिट नंबर दोनने ३,७५,७३८ मे. टन उसाचे गाळप करून १०.९५ टक्के साखर उताऱ्याने ३,५६,५०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन केले आहे. दोन्ही युनिटचे एकूण १४,९२,५५६ मे. टन ऊस गाळप करून १०,६७,३०० क्विंटल साखर पोत्याचे उत्पादन झाले आहे अशी माहिती यावेळी देण्यात आली.