नवी दिल्ली : ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांना सॉडिडेरिडॅडने ऊस उत्पादनासाठी मदतीचा हात दिला आहे. कंपनीने आता उसाची उत्पादकता वाढविण्यासह पाण्याचा योग्य उपयोग करण्यावर भर दिला आहे. याशिवाय कंपनी इको फ्रेंडली कृषी व्यवस्थेला पाठबळ देण्यासाठीची योजना तयार करीत आहे.
सॉडिडेरिडॅड कंपनी सद्यस्थितीत एकूण ३ लाख शेतकरी आणि २१ साखर कारखान्यांशी जोडली गेली आहे. आगामी चार वर्षांत, २०२१ पर्यंत १० लाख ऊस उत्पादक शेतकरी आणि ४० साखर कारखान्यांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट कंपनीचे आहे. ऊसाची शेती शाश्वत व्हावी या उद्देशाने आपल्या स्वतंत्र यंत्रणेद्वारे आणि निश्चित ध्येयाने कंपनी सद्यस्थितीत तीन लाख शेतकऱ्यांशी जोडली गेली आहे. आगामी तीन ते चार वर्षांमध्ये या कार्यक्रमांतर्गत किमान १० लाख शेतकऱ्यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
सॉलिडेरिडॅड कंपनीच्या साखर विकास कार्यक्रमाचे प्रमुख आलोक पांडे यांच्या म्हणण्यानुसार, कंपनी सद्यस्थितीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र, कर्नाटकातील २१ साखर कारखान्यांशी संलग्न आहे. कंपनी २०२५ पर्यंत सुमारे ४० साखर कारखान्यांसोबत भागिदारी करू इच्छिते. देशातील ऊस उद्योगावर साधारणतः ६० लाख छोटे शेतकरी अवलंबून आहेत. शेतीचा आकार छोटा असल्याने आणि संबंधीत उतपादन क्षमता नसल्याने भारताची उत्पादकता जगातील इतर साखर उत्पादक देशांपेक्षा खूपच पिछाडीवर आहे.
पांडे म्हणाले, ब्राझीलसह अन्य काही देशांच्या तुलनेत भारतातील शेतकऱ्यांचे प्रति हेक्टर ऊस उत्पादन कमी आहे. आता शेती करण्याच्या आपल्या पद्धतीमध्ये बदल करण्याची गरज आहे. कारण नव्या पद्धतीने उत्पादन वाढीसह खर्चातही कपात होत असल्याचे दिसून येत आहे. उत्पादकता सुधारण्यासाठी सॉलिडेरिडॅड साखर उद्योगाच्या हितासाठी एकत्र काम करीत आहे.