लॉरी ऑपरेटर्सचे आंदोलन मागे; ‘ज्याचा माल, त्याचा हमाल’ बाबत निर्णय दोन महिन्यात

कोल्हापूर सातारा सांगली कराड येथील ट्रक मालक, ट्रान्सपोर्टर वाहतूक संघटना, व्यापारी, कारखाने, उद्योजक यांची ज्याचा माल त्याचा हमाल या विषयावर कोल्हापुर जिल्हाधिकारी यांचे अध्यक्षतेखाली कोल्हापुर येथे बैठक संपन्न झाली.

गेल्या महिनाभरापासुन ज्याचा माल त्याचा हमाल या पार्श्व भुमीवर कोल्हापुर,सातारा, कराड सांगली येथील ट्रक मालकांनी भाड्यातुन वारणी न देण्यासंदर्भात तीव्र आंदोलन उभे केल्याने सर्वच प्रकारच्या वाहतुकीवर त्याचा परिणाम होण्यास सुरुवात झाली होती.

या आंदोलनाची दखल घेऊन कोल्हापुर जिल्हाधिकारी यांनी व्यावसायिक, कारखानदार,माथाडी, वाहतुकदारांची बैठक बोलावली होती.

माननीय जिल्हाधिकारी यांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार मालाची भरणी, उतरणी, वारणी आकारणीची जबाबदारी निश्चीत करणेकामी दोन महिन्याच्या मुदतीत कार्यवाही करण्याचे निश्चीत केले आहे.

या बैठकीमध्ये खालील निर्णय घेणेत आले – 

  • ट्रक चे भाडे सापी आकारावे म्हणजे भरणी, उतरणी अथवा वारणी यांचा अंर्तभाव ट्रक भाड्यात न करता निव्वळ भाडे आकारावे. निव्वळ ट्रक भाडे याची स्वतंत्र Transport L R अदा करावी.
  • हमाली, वारणी काटा यासाठी स्वतंत्र Transport L R अदा करावी. या L R मध्ये ट्रक भाडे नमुद करु नये.
  • कारखानदारांनी बिगर वारणी गाडी भरुन देण्यासंदर्भात तत्वतः मान्यता दिली आहे.
  • दोन महिन्याच्या मुदतीत दर १५ दिवसाला एक आढावा बैठक आयोजीत करुन वारणी ची जबाबदारी निश्चीत करणेकामी कोल्हापुर जिल्हाधिकारी यांनी पुढाकार घेतले बद्दल त्यांना मनपुर्वक धन्यवाद !!

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here