ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडवा : आयुक्त

मेरठ  : आयुक्त कार्यालयातील सभागृहात बुधवारी आयुक्त सेल्वा कुमारी जे. यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत विकासकामांचा आढावा घेण्यात आला. आयुक्तांनी आरोग्य केंद्रांवर डॉक्टरांची उपस्थिती, हेल्थ अँड वेलनेस सेंटरवर सीएचओंच्या उपस्थितीत नियमित बैठका घेण्याचे निर्देश दिले. विभागातील सर्व जिल्ह्यांतील सीएचसी, पीएचसी आणि प्रसूती केंद्रांच्या स्थितीबाबत त्यांनी माहिती घेत कुटूंब नियोजन, अॅम्ब्युलन्स, आरोग्य केंद्रावरील औषधे आदींच्या उपलब्धतेविषयी आढावा घेतला.

अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, भात खरेदी केंद्रांवर उद्दिष्टाच्या तुलनेत आतापर्यंत झालेल्या खरेदीची माहिती घेऊन आयुक्तांनी उद्दिष्ट पूर्ण करण्यास सांगितले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देणे तसेच मोहिउद्दिनपूर साखर कारखान्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांच्या समस्यांना प्राधान्य देऊन कार्यवाही करावी असे निर्देश आयुक्तांनी दिले. बैठकीस जिल्हाधिकारी दीपक मीणा, सीडीओ शशांक चौधरी, सीएमओ डॉ. अखिलेश मोहन यांच्यासह जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here