कोल्हापूर : देशात आणि राज्यात एकीकडे ऊस आणि साखर उत्पादन वाढत असताना दुसरीकडे काही शेतकरी ऊस पिकाला पर्याय शोधताना दिसत आहेत. विशेष म्हणजे उसाचे आगर असलेल्या कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी उसाऐवजी तंबाखू पिकाला प्राधान्य दिले आहे. उसाला लागणारी हुमणी, मिळणारा दर आणि कारखान्याला पाठवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीला कंटाळलेले ऊस उत्पादक तंबाखू पिकाकडे वळले आहेत. हिरण्यकेशी नदीकाठावरील ऊस पट्ट्याच्या दहा गावांमध्ये तंबाखूचे पीक घेण्याचा कल वाढत आहे.
निलजी, दुंडगे, हेब्बाळ, मुत्नाळ, हिटणी, माद्याळ, हनिमनाळ, बसर्गे, नांगनूर, इदरगुच्ची, अरळगुंडी, कडलगे, तेरणी, आदी १५ ते २० गावांमध्ये साधारण शंभर एकरांहून अधिक क्षेत्रात यंदा तंबाखूची लागवड झाली आहे. वि उसाला लागणाऱ्या हुमणी आणि कारखान्याला ऊस पाठवण्यासाठी कराव्या लागणाऱ्या कसरतीला अनेक शेतकरी कंटाळले आहेत. त्यातूनच तंबाखूचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र आहे. तंबाखूला मिळणाऱ्या दरामुळे हळूहळू तंबाखूचे क्षेत्र वाढताना दिसत आहे.
महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागात मोठ्या प्रमाणात तंबाखू उत्पादन…
कर्नाटकातील निपाणी, संकेश्वर, हत्तरगी परिसरात तंबाखू उत्पादन मोठ्या प्रमाणात आहे. तालुक्यातील ज्या गावात तंबाखूचे उत्पादन वाढत आहे, ती गावे कर्नाटकच्या या हद्दीला खेटून आहेत. निलजीचा तरुण उत्पादक विनायक परीट म्हणाला, उसाला भाव कमी व हुमणीचा त्रास मोठा आहे. तंबाखूला हुमणी लागत नाही. शेजारच्या कर्नाटकातील सोलापूरमध्ये जाऊन तंबाखू उत्पादकांची भेट घेऊन माहिती घेतली. त्यानुसार गतवेळी ३० गुंठ्यात सव्वा लाखाचे उत्पादन मिळाले. खर्च वजा जाता एक लाखाचे निव्वळ उत्पन्न पदरात पडले. यामुळे यावर्षी दीड एकरात तंबाखूचे पीक घेतले आहे.
साखर उद्योगाबाबत अधिक माहिती आणि अपडेट्ससाठी Chinimandi.com वाचत राहा.