सोमेश्वर साखर कारखान्याने कांडी बिल न दिल्यास उपोषण : सतीश काकडे यांचा इशारा

पुणे: सोमेश्वर साखर कारखान्याने गेल्या दोन्ही हंगामांत माळेगावपेक्षा सोमेश्वर गाळप, रिकव्हरी व उत्पादन, साखर विक्री यात अग्रेसर असताना ६१ रुपयांनी कमी दर दिला. पहिली उचल लक्षात घेता माळेगावपेक्षा अंतिम दर कमी मिळण्याची शक्यता आहे. कारखान्याला इतर उपपदार्थांतून माळेगावपेक्षा जादा उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे कारखान्याने २०० रुपये कांडी बिल द्यावे; अन्यथा शेतकरी कृती समितीच्यावतीने उपोषण केले जाईल, असा इशारा समितीचे अध्यक्ष सतीश काकडे यांनी दिला.

याबाबत काकडे यांनी सांगितले की, गेल्या हंगामात कारखान्याने ११.९२ टक्के उताऱ्याने १२,५६,००० टन ऊस गाळप केले. यापैकी १,०५,००० टन गेटकेन ऊस होता. २०२३-२४ मध्ये १२.२१ टक्के उताऱ्याने १५ लाख २३ हजार टन गाळप केले. त्यात १ लाख ८५ हजार गेटकेन होता. त्यामुळे ‘सोमेश्वर’चा वाहतूक खर्च जादा झाला असा आरोप काकडे यांनी यावेळी केला. कारखान्याने खोटी आकडेवारी सांगत विस्तारीकरण केले. गेली तीन वर्षे गेटकेन ऊस आणावा लागला. दुष्काळी स्थिती असताना सभासदांचा ऊस मागे ठेवला. त्यामुळे नुकसान झाले. आता २०० रुपये खोडकी बिल कारखान्याने द्यावे तसेच अनुदानातही ५० रुपयांनी वाढ करावी; अन्यथा समितीकडून उपोषण केले जाईल.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here