पुणे जिल्ह्यातील सोमेश्वर, विघ्नहर, भीमाशंकर साखर कारखान्यांचा देशात डंका, ‘भीमाशंकर ‘ला सातव्यांदा पुरस्कार

पुणे : पारगाव (ता. आंबेगाव) येथील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑपरेटिव्ह शुगर फॅक्टरीज (नवी दिल्ली) यांचा सन २०२३-२४ करिता ‘देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार’ जाहीर झाला आहे. हा पुरस्कार सात वेळा मिळविणारा एकमेव साखर कारखाना असल्याचे ‘भीमाशंकर’चे अध्यक्ष बाळासाहेब यांनी सांगितले. नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फैक्टरीज यांच्यामार्फत देशातील २०२३-२४ च्या गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कारखान्यांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारांची घोषणा शुक्रवारी करण्यात आली. त्यात देशातील वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा पुरस्कार जाहीर झाला.

‘विघ्नहर’ने परंपरा कायम राखली…

श्री विप्नहर साखर कारखान्याला नॅशनल फेडरेशन ऑफ को ऑपरेटिव्ह शुगर फैक्टरीज लिमिटेड (नवी दिल्ली) यांच्याकडून गळीत हंगाम २०२३-२४ करिता प्रथम क्रमांकाचा उत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. कारखान्याचा पारदर्शक कारभार आणि शेतकरी हिताचे निर्णय, तसेच सभासद, उस उत्पादकांच्या विश्वासाच्या जोरावर कारखान्याने आपली पुरस्कार मिळविण्याची परंपरा कायम राखली आहे. कारखान्याने साखर कारखानदारी संबंधित विविध संस्थांचे ६३ पुरस्कार मिळाले असून, यंदाच्या मिळालेल्या या पुरस्काराने एकूण पुरस्कारांची संख्या ६४ झाली आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील सत्यशील शेरकर यांनी दिली. शेरकर म्हणाले, विघ्नहर कारखान्याने २०२३-२४च्या गळीत हंगामात १० लाख २३ हजार ४२५ टन उसाचे गाळप केले असून, ११ लाख ५० हत्यार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन केले. ११.६३ टक्के साखर उतारा राखण्यात यश मिळविले. सहवीजनिर्मिती प्रकल्पातून ४ कोटी १२ लाख ६३ हजार २०० युनिट वीज निर्यात केली. कारखान्याचा विस्तारित डिस्टिलरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरु असून, डिस्टिलरी प्रकल्पातून ९५ लाख १७ हजार ८३९ लिटर अल्कोहोलची व ७० लाख ७९ हजार ७५८ लिटर इथेनॉल निर्मिती झाली.

‘सोमेश्वर’ला वर्षभरात मानाचा पाचवा पुरस्कार

साखर, बीज, इथेनॉल, अर्थ अशा सर्वच बाबींमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सोमेश्वर कारखान्याला ‘व्हीएसआय ने राज्यातील सर्वोत्कृष्ट कारखाना म्हणून गौरविले होते. अ राष्ट्रीय पातळीवरही सोमेश्वर कारखान्याचा डंका वाजला आहे. राष्ट्रीय सहकारी साखर महासंघानी (एनएफसीएसएफ) ‘सोमेश्वर ‘ला राष्ट्रीय पातळीवरी सर्वोत्कृष्ट कार्यक्षमता पुरस्कार जाहीर केला आहे. मागील वर्षभरात ‘सोमेश्वर’ला मिळालेला मानाचा पाचवा पुरस्कार आहे. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूकडून सोमेश्वरला राज्यातील सर्वोत्कृष्ट आर्थिक स्थापन, सर्वोत्कृष्ट वित्त व्यवस्थापक व मध्य विभागातील सर्वोत्कृष्ठ तांत्रिक कार्यक्षमता हे पुरस्कार प्राप्त झाले होते. सर्वोत्कृष्ट कार्यकारी संचालक पुरस्कारही मिळाला होता. याशिवाय को-जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाचाही देशपातळीवरील सर्वोत्कृष्ट सहवीजनिर्मिती प्रकल्प पुरस्कार जाहीर झाला आहे.

 साखर उद्योगाच्या बातम्या आणि संबंधित चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी वाचत रहा चिनीमंडी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here