सोनीपत : सोनीपत सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरळीत असून कारखान्याला आर्थिक लाभही मिळत आहे. कारखाना व्यवस्थापन या गळीत हंगामात बगॅस विक्री कररुन आर्थिक नफा मिळवत आहे. आतापर्यंत कारखान्याने ८० लाख रुपयांच्या बगॅसची विक्री केली आहे. कारखान्याच्या कार्यकारी संचालकांनी कर्मचारी, अधिकाऱ्यांना या नफ्याचे श्रेय दिले आहे. साखर उताऱ्यातही सोनीपत साखर कारखान्याने पहिला क्रमांक मिळवला आहे.
हरीभूमी वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, शहरातील कमी मार्गावर असलेल्या सहकारी साखर कारखाना सोनीपतने वर्ष २०२२-२३ गळीत हंगामाला १७ नोव्हेंबर २०२२ रोजी सुरुवात केली. गाळप २१ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आले. आतापर्यंत १८ लाख ७० हजार क्विंटल उसाचे गाळप करण्यात आले आहे. या हंगामात कारखाना ब्रेकडाऊन होण्याच्या नाममात्र घटना घडल्या आहेत. त्यामुळे उसाचे गाळप गतीने सुरू आहे. कारखाना प्रशासनाने ३६ लाख क्विंटल उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखाना प्रशासनाने ३० एप्रिलपर्यंत गळीत हंगाम पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत आहे. प्रतीदिन २२ लाख क्विंटल ऊस गाळप क्षमता कारखान्याची आहे. मात्र, कारखान्याने त्यापेक्षा अधिक गाळप करुन विक्रम केला आहे. आतापर्यंत ३५ लाख क्विंटल बगॅसची विक्री करून ७९ लाख रुपयांचा नफा मिळवला आहे.