सोनहिरा कारखान्याला NFCSF तर्फे विक्रमी साखर उताऱ्याबद्दल पुरस्कार प्रदान

सांगली : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे (NFCSF) नवी दिल्ली येथे केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याला उच्चांकी साखर उताऱ्याबद्दलचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल आणि राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, संचालक रघुनाथराव कदम, बापूसो पाटील, पी. सी. जाधव, पोपटराव महिंद, युवराज कदम, पंढरीनाथ घाडगे, सयाजी धनवडे, दिलीपराव सूर्यवंशी, तानाजीराव मोहिते, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, डी. के. कदम, संभाजी जगताप, कार्यकारी संचालक एस. एफ. कदम उपस्थित होते.

देशातील २६० सहकारी साखर कारखाने व ९ राज्यांतील साखर संघ सदस्य असलेल्या नवी दिल्लीस्थित राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना संघ या शिखर संस्थेमार्फत प्रतिवर्षी विविध कारखान्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देण्यात येतात. देशातील सहकारी साखर कारखान्यांचे मूल्यांकन करण्यात येते. यातीलच विक्रमी साखर उतारा मिळवल्याबद्दलचा पुरस्कार सोनहिरा कारखान्याने पटकावला. सभासद शेतकऱ्यांनी दाखवलेला विश्वास, उत्तम नियोजन व शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन यामुळे उसाच्या सरासरी उत्पनात वाढ झाली आहे. त्यातून हा पुरस्कार मिळाल्याचे कारखान्याच्यावतीने सांगण्यात आले.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघातर्फे (NFCSF) गुणवत्ता पारितोषिक वितरण कार्यक्रम १० ऑगस्टला नवी दिल्ली येथे पार पडला. यात विविध प्रकारांमध्ये देशातील २१ साखर कारखान्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यामध्ये सर्वाधिक १० पुरस्कार महाराष्ट्रातील साखर कारखान्यांना मिळाले. देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याला दिला जाणारा वसंतदादा पाटील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखाना पुरस्कार पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला मिळाला आहे. पुरस्कार वितरण सोहळा दिल्लीतील डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे झाला.

साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here