सांगली:डॉ.पतंगराव कदम सोनहिरा साखर कारखान्याने सन २०२४-२५ च्या गळीत हंगामामध्ये १४ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे.कारखान्याच्या सर्वच विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केल्यामुळे कारखान्याची प्रगती झाली आहे.कारखान्याने कायमच आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी केलेली आहे.त्यामुळे कारखान्यास राष्ट्रीय पातळीवर पुरस्कार मिळालेले आहेत, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष तथा माजी आमदार मोहनराव कदम यांनी दिली. कारखान्याचा मिल रोलरचे पूजन कदम यांच्या अध्यक्षतेखाली व कारखान्याचे संचालक रघुनाथराव कदम यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
यावेळी मोहनराव कदम म्हणाले की, चालू हंगामामधील १४ लाख टन ऊस गाळपाच्या उद्दिष्टपूर्तीसाठी ऊस तोडणीसाठी ३५० चारचाकी वाहने, ५५० अंगद गाडी, ३५० बैलगाडी व १३ हार्वेस्टिंग मशीन सज्ज आहेत. कारखान्याच्या मिलचे विस्तारीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. कारखाना ऑक्टोबरपूर्वी गळीतासाठी सज्ज असेल.शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस गळीतास पाठवावा.यावेळी उपाध्यक्ष पुरुषोत्तम भोसले, संचालक पंढरीनाथ घाडगे, बापूसो पाटील, पी. सी. जाधव, युवराज कदम, सयाजी धनवडे, दिलीपराव सूर्यवंशी, तानाजीराव शिंदे, संभाजीराव जगताप, जगन्नाथ माळी, शिवाजी गढळे, शिवाजी काळेबाग, एस. एफ. कदम आदी उपस्थित होते.