दक्षिण आफ्रिका : साखर उद्योगाला सरकार करणार मदत

केपटाउन : दक्षिण आफ्रिकेत जुलै महिन्यात देशात झालेली लुटमार, दंगलींमुळे नुकसान सोसावे लागलेल्या व्यवसायांना मदत करण्यासाठी एकूण R1.5 billion निधीला मंजुरी देण्यात आली आहे अशी माहिती व्यापार, उद्योग मंत्री इब्राहिम पटेल यांनी दिली. ज्या उद्योग, व्यवसायांची संपत्ती या दंगलींमध्ये नष्ट झाली, त्यांना मदत मिळावी असा या मदतीचा उद्देश आहे, असे पटेल यांनी सांगितले.

ते म्हणाले, औद्योगिक विकास महामंडळ (आयडीसी), सॉलिडॅरिटी फंड आणि नॅशनल एम्पॉवरमेंट फंडाने (एनईएफ) लूट झालेल्या व्यवसायांच्या मदतीसाठी १.५ अब्ज रुपये दिले आहेत. साखर उद्योगाकडून आपल्याकडे एक निवेदन मिळाले होते, असे पटेल यांनी सांगितले. त्यमुळे दंगलीमध्ये ज्यांचा ऊस जाळण्यात आला होता त्यांसह १९२ ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान भरुन काढण्यासाठी R1.5 billion निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पटेल यांनी सांगितले की, बहूतांश व्यवसायांना याआधीच मदत अथवा पाठबळ देण्यात आले आहे. असंतोषामुळे क्वाजुलू-नताल आणि गौतेंग या दोन विभागात शेकडो व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले. दंगलीत एकूण ३२० व्यापाक केंद्रांचे नुकसान झाले. या महिन्याच्या सुरुवातील एनएफई आणि सॉलिडेरिटी फंडाने अशा नुकसानग्रस्त व्यवसायिकांना मदतीसाठी R450 मिलियन एसएमएमई मदत योजनेची स्थापना केली आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here