केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेत एप्रिल २०२१ पासून सुरू होणाऱ्या विपणन वर्षात कच्च्या साखरेचे उत्पादन ७ टक्क्यांनी घसरून २.० मिलियन मेट्रिक टन होईल असा अंदाज अमेरिकन कृषी विभागाने (यूएसडीए) वर्तवला आहे.
यूएसडीने आपल्या नोव्हेंबर महिन्याच्या साखरेच्या जागतिक बाजारपेठ आणि व्यापार अहवालात म्हटले आहे की, ही घसरण उसाची कमी उपलब्धता आणि कमी गाळप क्षमतेमुळे दिसून येत आहे. तर लोकसंख्या वाढ, देशांतर्गत वाढ या कारणांमुळे साखरेचा खप वाढण्याची अपेक्षा आहे. यूएसडीएने सांगितले की, कमी पुरवठ्यामुळे निर्यात आणि साठवणूक १० लाख टनांनी घटून ६,९०,००० टन होण्याची शक्यता आहे.
दक्षिण आफ्रिका यूएस टॅरीफ दर कोटा पद्धतीचा लाभार्थी आहे. त्याला यूएसला कर मुक्त कच्ची साखर निर्यात करण्याची परवानगी आहे. यूएसडीएने सांगितले की, दक्षिण आफ्रिकेने साखरेचा २४,२२० टन कोटा आधीच निर्यात केला आहे. हा कोटा २०२१ या आर्थिक वर्षासाठी मंजूर करण्यात आला होता.